बातम्या
कुंभोज येथे २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवले
By nisha patil - 5/19/2026 9:25:33 PM
Share This News:
कुंभोज येथे २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवले
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे ऋतुजा विशाल पालखे (वय २५) या नवविवाहितेने सोमवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्या जाचाला कंटाळूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
ऋतुजाचा विवाह २०२१ मध्ये विशाल पालखे याच्याशी झाला होता. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. मात्र, गेल्या काही काळापासून सासरच्या घरी वेगवेगळ्या कारणांवरून सतत वाद आणि छळ सुरू होता, असा आरोप केला जात आहे. सोमवारी ऋतुजाचे हेरवाड (ता. शिरोळ) येथील माहेरचे नातेवाईक तिला भेटण्यासाठी कुंभोज येथे आले होते. ते निघून गेल्यानंतर काही वेळातच ऋतुजाने गळफास घेतला.
कुंभोज येथे २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवले
|