बातम्या

लग्नसमारंभातूनच चिमुकलीचा अपहरण

Kidnapping of a child from a wedding ceremony


By nisha patil - 1/12/2025 5:47:03 PM
Share This News:



लग्नसमारंभातूनच चिमुकलीचा अपहरण;

उसाच्या शेतात नराधमाचा अत्याचाराचा प्रयत्न,

पोलिसांची चार तासांत धडाकेबाज कारवाई

करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव–कात्यायनी मार्गावर सहा वर्षांच्या चिमुकलीवर ओळखीतीलच विकास आनंदा कांबळे (वय 28) याने लग्नसमारंभातून फुस लावून अपहरण करत उसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.
 

ओरडून प्रतिकार करणाऱ्या चिमुकलीच्या तोंडात बोळा कोंबत मारहाण करत ‘तुझ्या पप्पांना मारून टाकीन’ अशी धमकी दिली.
घटनानंतर पळ काढलेल्या आरोपीला इस्पूर्ली पोलिसांनी केवळ चार ते पाच तासांत कागल हायवेवर चालू बांधकामाजवळ धडक कारवाई करून ताब्यात घेतले.
पिडितेला तात्काळ उपचारासाठी सी.पी.आर.मध्ये हलवण्यात आले असून आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल.


लग्नसमारंभातूनच चिमुकलीचा अपहरण
Total Views: 15