बातम्या
आरोग्यमंत्र्यांकडे किरण कोले यांची हाक; चंदगडमध्येच दर्जेदार रुग्णालय उभारा!
By nisha patil - 11/25/2026 3:50:45 PM
Share This News:
आरोग्यमंत्र्यांकडे किरण कोले यांची हाक; चंदगडमध्येच दर्जेदार रुग्णालय उभारा!
चंदगड तालुक्यात सुसज्ज रुग्णालय उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी चंदगडमधील रुग्णांना शेजारच्या तालुक्यांमध्ये जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तालुक्यातच दर्जेदार रुग्णालय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण कोले यांनी केली आहे.
चंदगड हा दुर्गम, डोंगराळ आणि सीमावर्ती तालुका असल्याने येथील सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी आणि गरीब रुग्णांना आरोग्य सुविधांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार देणारे एकही सुसज्ज सरकारी किंवा खासगी रुग्णालय उपलब्ध नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासाठी तालुक्यातील आरोग्यविषयक समस्यांचा सर्वे करून शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देणारे सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी किरण कोले यांनी पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आरोग्यमंत्र्यांकडे किरण कोले यांची हाक; चंदगडमध्येच दर्जेदार रुग्णालय उभारा!
|