राजकीय

शिरोली प्रकरणात किरीट सोमय्यांची एंट्री; सखोल तपासाची मागणी

Kirit Somaiya's entry in Shiroli case


By nisha patil - 1/5/2026 1:03:20 PM
Share This News:



शिरोली प्रकरणात किरीट सोमय्यांची एंट्री; सखोल तपासाची मागणी

 
शिरोली येथील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते व राज्यसभा खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्याला भेट देत तपासाचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेऊन त्यांनी हातकणंगले व शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या चौकशीची माहिती घेतली आणि दोषींवर कठोर कारवाईसह सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या.


यानंतर शिरोली पुलाची येथे ग्रामस्थ व हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना स्थानिक पातळीवर संबंधित तरुणांविरोधात सामाजिक व प्रशासकीय निर्बंध लावल्याचा दावा मांडण्यात आला. या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी अशा घटनांमागील संभाव्य नेटवर्क, आर्थिक पाठबळ आणि संघटित स्वरूपाचा तपास करण्याची गरज अधोरेखित केली.


दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणावरून कोल्हापुरात राजकीय हालचाली वेगात
Total Views: 6