बातम्या

*गोकुळ दूध संघातील शासननियुक्त चार सदस्य आणि त्यांना दिलेल्या मताधिकाराला किसान सभेचा तीव्र विरोध-संग्राम सावंत 

Kisan Sabha strongly opposes the four government


By nisha patil - 7/11/2026 11:06:36 PM
Share This News:



*गोकुळ दूध संघातील शासननियुक्त चार सदस्य आणि त्यांना दिलेल्या मताधिकाराला किसान सभेचा तीव्र विरोध-संग्राम सावंत 
 

*या निर्णयाविरोधात सोमवारी मोर्चा काढणार
 

*आजरा(हसन तकीलदार) गोकुळ दूध संघामध्ये महायुती शासनाने नियुक्त केलेल्या चार सदस्यांना व त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाला अखिल भारतीय किसान सभेचा तीव्र विरोध आहे. सहकारी दूध संस्थांच्या लोकशाही कारभारामध्ये शासनाने अशा प्रकारे हस्तक्षेप करणे अन्यायकारक असून, दूध उत्पादक सभासदांच्या लोकशाही अधिकारांवर गदा आणणारे आहे.त्यामुळे भारतीय किसान सभा याचा विरोध करते असे कॉ. संग्राम सावंत यांनी सांगितले.

गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादक शेतकरी आणि सहकारी संस्थांचा संघ आहे. त्यामुळे संघाच्या निर्णयप्रक्रियेमध्ये दूध उत्पादक सभासदांचे प्रतिनिधित्व आणि लोकशाही अधिकार अबाधित राहिले पाहिजेत. शासननियुक्त सदस्य व त्यांना मताधिकार देण्याचा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, अशी किसान सभेची ठाम मागणी आहे.

या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 9 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये दूध उत्पादक शेतकरी, सभासद, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि सर्व समविचारी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, 
 

सहकारी चळवळीतील लोकशाही वाचविण्यासाठी आणि दूध उत्पादक सभासदांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी एकजुटीने या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय किसान सभा या संघटनेच्या  वतीने करण्यात येत आहे.यावेळी  कॉम्रेड संग्राम सावंत
 (समन्वयक व जिल्हा सहसचिव, अखिल भारतीय किसान सभा)

 

ॲड. दशरथ दळवी, कॉ. शिवाजी गुरव, संदीप भोगण,भगवान सुर्यवंशी, संभाजी मोहिते, सुरेखा पाथरवट, संजय कांबळे, समीर खेडेकर, सचिन लोहार, अनिल सुतार, संतोष माने, भारती पवार, लक्ष्मी कांबळे, मजीद मुल्ला, अक्षय कांबळे, जयश्री कांबळे, सुप्रिया पाटील, अश्विनी कांबळे, विनोद देवेकर, उत्तम कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते


*गोकुळ दूध संघातील शासननियुक्त चार सदस्य आणि त्यांना दिलेल्या मताधिकाराला किसान सभेचा तीव्र विरोध-संग्राम सावंत 
Total Views: 13