बातम्या
किसान सभेच्या नेतृत्वात देवस्थान जमीनधारकांचे उपविभागीय अधिकारी,गडहिंग्लज यांना निवेदन
By nisha patil - 11/6/2026 4:10:40 PM
Share This News:
*किसान सभेच्या नेतृत्वात देवस्थान जमीनधारकांचे उपविभागीय अधिकारी,गडहिंग्लज यांना निवेदन*
आजरा(हसन तकीलदार)*:-देवस्थान जमिनीबाबत होऊ घातलेला कायदा स्थगित करून देवस्थान जमीनधारकांवर अन्याय केला आहे.
यासाठी विविध जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी त्याचप्रमाणे हा कायदा स्थगित केल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वात देवस्थान जमीनधारक आजरा, चंदगड, गडहिंग्लज शेतकरी यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, देवस्थान जमीन धारकांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे सातत्याने लढा दिला. त्यामुळे देवस्थान जमिनी वर्ग 1 करण करून इतर राज्याप्रमाणे शेतकऱ्यांना शेतजमिनी कायम मालकी हक्काने मिळण्यासाठी सरकारने सकारात्मक निर्णय घेतला होता व कायदा तयार करण्यासाठी मसुदाही तयार झाला. त्यावर हरकती मागवण्यात आल्या परंतु देवस्थान जमिनीशी ज्यांचा संबंध नाही अशा काही व्यक्ती आणि संघटनानी विरोधी भूमिका मांडल्याने देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांचा होऊ घातलेला कायदा स्थगित करून पुन्हा कमिटी नेमून वेळकाढूपणा केल्याने या स्थगिती निर्णयाचा निषेध करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदेशाची होळी करण्यासाठी आंदोलने सुरु आहेत. शासनाच्या या चुकीच्या आणि वेळकाढू धोरणाचा निषेध नोंदवून सर्वत्र होत असलेल्या आंदोलनांना आम्ही पठिंबा देत आहोत असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर कॉ. शिवाजी गुरव, संजय चाळके, संभाजी गुरव, शिवाजी विठोबा गुरव, शिवाजी भीमा गुरव, हणमंत गुरव, तुकाराम लोखंडे, संभाजी मोहिते आदींच्या सह्या आहेत
किसान सभेच्या नेतृत्वात देवस्थान जमीनधारकांचे उपविभागीय अधिकारी,गडहिंग्लज यांना निवेदन
|