बातम्या
गणेश आगमन मिरवणुकीत चाकू हल्ला!
By nisha patil - 8/29/2025 3:16:15 PM
Share This News:
गणेश आगमन मिरवणुकीत चाकू हल्ला!
नाचण्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, सीसीटीव्हीत कैद प्रकार
कोल्हापूर | गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान कोल्हापूर शहर हादरवणारी घटना घडली आहे. राजारामपुरी परिसरात नाचण्याच्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात वाजीद जमादार हा तरुण गंभीर जखमी झाला असून, परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण पसरले.
मिळालेल्या माहितीनुसार, वाजीद जमादार याने आपल्या मित्रांना नाचण्यासाठी आग्रह केला होता. त्यावरून वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले. अज्ञात आरोपींनी जमादारवर वार केला. धक्कादायक म्हणजे हा प्रकार थेट सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
जखमी वाजीद जमादार याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची उपचार सुरू आहेत. राजारामपुरी पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपींचा शोध तीव्र करण्यात आला आहे. पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा घटना घडल्याने शहरातील शांतता व सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गणेश आगमन मिरवणुकीत चाकू हल्ला!
|