बातम्या

कोल्हापुरात पाणीपुरवठा पूर्ववत; नागरिकांना दिलासा Dr

Kolhapur 6


By nisha patil - 4/30/2025 8:38:41 PM
Share This News:



कोल्हापुरात पाणीपुरवठा पूर्ववत; नागरिकांना दिलासा

काळम्मावाडी योजनेतील बिघाड दुरुस्त; उपसा केंद्र पुन्हा कार्यान्वित

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील उपसा केंद्रातील सॉफ्टवेअर बिघाडाचे दुरुस्तीचे काम सोमवारी मध्यरात्री पूर्ण झाले. त्यामुळे मंगळवारी शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला. आज, बुधवारी पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने सांगितले.

बिघाडामुळे तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प होता. पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले होते. महापालिकेने २५ टँकरद्वारे तात्पुरती व्यवस्था केली होती.

बिघाड दुरुस्तीनंतर उपसा सुरू झाला असून, शहरात थेट पाईपलाईनमधून नियमित पाणीपुरवठा सुरू आहे.


कोल्हापुरात पाणीपुरवठा पूर्ववत; नागरिकांना दिलासा
Total Views: 110