बातम्या
हातकणंगलेत राज्य स्थापना दिनी शासकीय ध्वजारोहण उत्साहात
By nisha patil - 1/5/2025 2:43:43 PM
Share This News:
हातकणंगलेत राज्य स्थापना दिनी शासकीय ध्वजारोहण उत्साहात
हातकणंगले (१ मे) – महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त प्रमुख शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज हातकणंगले तहसील कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. या कार्यक्रमात हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमास तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, नायब तहसीलदार पी.एस.एल. पिलाने, संजय पुजारी, निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण, जि.प. सदस्य प्रसाद खोबरे, अमोल गावडे, तानाजी ढाले, महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार माने यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेत राज्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. कार्यक्रम शांतता, शिस्त आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात पार पडला.
हातकणंगलेत राज्य स्थापना दिनी शासकीय ध्वजारोहण उत्साहात
|