बातम्या
"कोल्हापूर अंबाबाई मंदिर नवरात्रोत्सव: भाविकांसाठी सुरक्षीत आणि सुव्यवस्थित दर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात"
By nisha patil - 9/20/2025 11:20:48 AM
Share This News:
कोल्हापूर:- कोल्हापूरच्या करवीर येथील अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांना देवीचे दर्शन कमी वेळात आणि सुव्यवस्थित पद्धतीने करता यावे, यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिरामध्ये विशेष दर्शन रांग तयार केली आहे. तसेच, उंची, पावसाचा परिणाम टाळण्यासाठी मंदिरात मंडप उभारण्यात आला आहे.
दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या काळात अंबाबाई मंदिरात दररोज सरासरी तीन ते चार लाख भाविक येतात. या काळात देवीचा पालखी सोहळा, नगर प्रदक्षिणा, ललित पंचमीला टेंबलाई देवीची भेट आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी मोठी गर्दी होते.
यंदा दोन खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्या मंदिरातील गर्दीवर लक्ष ठेवतील आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना त्वरित सूचना देतील. यंत्रणेच्या माध्यमातून शहरातील वाहतुकीची माहिती, कोंडी झालेले रस्ते आणि पर्यायी मार्ग याबाबत पोलिसांना माहिती मिळणार आहे, ज्यामुळे गर्दी नियंत्रण आणि अपघात टाळणे शक्य होईल.
"कोल्हापूर अंबाबाई मंदिर नवरात्रोत्सव: भाविकांसाठी सुरक्षीत आणि सुव्यवस्थित दर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात"
|