राजकीय

कोल्हापूर जिल्हा नगरपालिका निवडणूक : सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत 28.12% मतदान

Kolhapur District Municipality Election


By nisha patil - 2/12/2025 12:31:00 PM
Share This News:



कोल्हापूर दि. 2 (जि. मा. का) : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी आज मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी 7.30 ते 11.30 या चार तासांत एकूण 28.12 टक्के मतदान झाले आहे. एकूण 2,55,737 मतदारांपैकी 71,912 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

नगरपरिषदा — मतदारसंख्या, झालेले मतदान व टक्केवारी

जयसिंगपूर – 49,747 पैकी 9,023 (18.14%)

मुरगूड – 10,128 पैकी 3,405 (33.62%)

मलकापूर – 4,934 पैकी 1,758 (35.63%)

वडगाव – 23,044 पैकी 8,119 (35.23%)

गडहिंग्लज – 30,161 पैकी 7,968 (26.42%)

कागल – 28,753 पैकी 9,033 (31.42%)

पन्हाळा – 2,967 पैकी 953 (32.12%)

कुरुंदवाड – 22,224 पैकी 7,504 (33.77%)

हुपरी – 24,802 पैकी 6,428 (25.92%)

शिरोळ – 24,539 पैकी 6,531 (26.61%)


नगरपंचायती — मतदारसंख्या, झालेले मतदान व टक्केवारी

आजरा – 14,686 पैकी 4,737 (32.26%)

चंदगड – 8,315 पैकी 2,720 (32.71%)

हातकणंगले – 11,437 पैकी 3,733 (32.64%)


जिल्ह्यातील मतदानाचा वेग मध्यम असून दुपारनंतर मतदानात वाढ होण्याची शक्यता निवडणूक विभागाने व्यक्त केली आहे.


कोल्हापूर जिल्हा नगरपालिका निवडणूक : सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत 28.12% मतदान
Total Views: 36