विशेष बातम्या
कोल्हापूर अर्थ वॉरियर्सतर्फे जुने देवी-देवतांचे फोटो व ई-वेस्ट संकलन उपक्रम
By nisha patil - 5/23/2025 3:39:42 PM
Share This News:
कोल्हापूर अर्थ वॉरियर्सतर्फे जुने देवी-देवतांचे फोटो व ई-वेस्ट संकलन उपक्रम
कोल्हापूर, ता. २५ मे — पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या कोल्हापूर अर्थ वॉरियर्स या संस्थेतर्फे जुने देवी-देवतांचे जीर्ण फोटो, मूर्ती तसेच इलेक्ट्रॉनिक व प्लास्टिक कचरा संकलनाचा उपक्रम येत्या रविवार दिनांक २५ मे रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
सदर संकलन करवीर तीर्थ अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये, आयरेकर गल्ली, रंकाळा टॉवर समोर, कोल्हापूर येथे होणार आहे. जीर्ण झालेले फोटो, पोत्या व मूर्ती इच्छुकांनी या ठिकाणी आणाव्यात. हे साहित्य विधीपूर्वक पूजन करून पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित करण्यात येणार आहे.
तसेच या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वेस्ट (E-Waste) आणि प्लास्टिक वेस्ट देखील संकलित केले जात असून, त्यानंतर ते अधिकृत रिसायकलिंग केंद्राकडे पाठवले जाते.
हा उपक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी नियमितपणे राबविला जातो. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
संपर्क:
आशिष कोंगळेकर – 9226824088
नारायण ळलित – 7507602000
कोल्हापूर अर्थ वॉरियर्सतर्फे जुने देवी-देवतांचे फोटो व ई-वेस्ट संकलन उपक्रम
|