राजकीय

कोल्हापूर आयटी पार्कचा निर्णय अंतिम टप्प्यात. आमदार अमल महाडिक यांचा पाठपुरावा यशस्वी

Kolhapur IT Park decision in final stage


By nisha patil - 12/13/2025 1:27:59 PM
Share This News:



कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा आयटी पार्कचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला हा विषय मार्गी लावण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत थेट निर्णय प्रक्रियेला गती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह महसूल, उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील वरिष्ठ मंत्र्यांशी थेट संवाद, पत्रव्यवहार व बैठका घेऊन आयटी पार्कचा मुद्दा प्राधान्यक्रमावर आणण्यात आला आहे.

शेंडा पार्क परिसरात आयटी पार्कसाठी ३४ हेक्टर जमीन, जिल्हा क्रीडा संकुलासाठी ६ हेक्टर आणि शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयासाठी २ हेक्टर असा ४२ हेक्टरचा समन्वयित विकास आराखडा मांडण्यात आला असून, यामुळे कोल्हापूरला आयटी, शिक्षण व क्रीडा क्षेत्रात एकाचवेळी नवी ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयटी पार्क प्रत्यक्षात साकार झाल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून शहराच्या आर्थिक विकासाला नवे बळ मिळणार आहे.


कोल्हापूर आयटी पार्कचा निर्णय अंतिम टप्प्यात... आमदार अमल महाडिक यांचा पाठपुरावा यशस्वी
Total Views: 51