राजकीय

कोल्हापूर महापालिका निवडणूक 2025: प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर

Kolhapur Municipal Corporation Election 2025


By nisha patil - 11/20/2025 6:20:49 PM
Share This News:



कोल्हापूर महापालिका निवडणूक 2025: प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर

कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. विना-फोटो सॉफ्ट कॉपी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून फोटोसह हार्ड कॉपी (प्रिंट) महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिस क्रमांक 1, 2, 3 आणि 4 तसेच निवडणूक कार्यालयात पाहता येणार आहे.

ज्या नागरिकांना फोटोसह प्रिंटेड मतदार यादीची प्रत हवी असेल, त्यांनी निवडणूक कार्यालय, ताराबाई गार्डन, सासने ग्राउंडजवळ येथे प्रति पान 2 रुपये शुल्क भरून प्रत मिळवू शकतात. (फोटोसह सॉफ्ट कॉपी PDF उपलब्ध करून दिली जाणार नाही.)

हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी नागरिकांना 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत संधी देण्यात आली आहे. अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी 5 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे.

मतदार यादीवरील हरकती किंवा सूचना संबंधित विभागीय कार्यालयातील प्राधिकृत अधिकाऱ्याकडे दाखल कराव्यात. यासाठी नमुना-अ (मतदारांसाठी) आणि नमुना-ब (तक्रारदारांसाठी) हे विहित नमुने विभागीय कार्यालयांमध्ये तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


कोल्हापूर महापालिका निवडणूक 2025: प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर
Total Views: 136