राजकीय
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग 19 व 20 मध्ये कॉर्नर सभा उत्साहात संपन्न
By Administrator - 10/1/2026 1:28:31 PM
Share This News:
कोल्हापूर :- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 19 व 20 मध्ये कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांना राज्याचे मंत्री मा. हसन मुश्रीफ, खासदार मा. धनंजय महाडिक तसेच भाजप प्रदेश सचिव मा. महेश बाळासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या कॉर्नर सभांमध्ये प्रभागातील उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित नेत्यांनी स्थानिक विकास, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व मूलभूत प्रश्नांवर मार्गदर्शन करत नागरिकांशी थेट संवाद साधला.
मा. महेश बाळासाहेब जाधव यांनी प्रभागातील विकासकामांचा आढावा घेत भविष्यातील योजनांची माहिती दिली. तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या कॉर्नर सभांमुळे प्रभाग 19 व 20 मध्ये निवडणूक वातावरण अधिकच तापले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग 19 व 20 मध्ये कॉर्नर सभा उत्साहात संपन्न
|