राजकीय
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ : प्रभाग ४, ७, १६, १८, १९ व २० मध्ये महायुतीच्या कॉर्नर सभा उत्साहात
By nisha patil - 10/1/2026 3:21:01 PM
Share This News:
कोल्हापूर:- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ४, ७, १६, १९ , २० व १८ मध्ये महायुतीच्या वतीने कॉर्नर सभा आयोजित करण्यात आल्या. या सभांना खासदार धनंजय महाडिक तसेच भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कॉर्नर सभांमधून नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक विकासकामे, आगामी नियोजन व महायुती सरकारच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
यावेळी संबंधित प्रभागांतील उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ : प्रभाग ४, ७, १६, १८, १९ व २० मध्ये महायुतीच्या कॉर्नर सभा उत्साहात
|