बातम्या
कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रारूप प्रभाग रचना जाहीर
By nisha patil - 3/9/2025 5:07:57 PM
Share This News:
कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रारूप प्रभाग रचना जाहीर
कोल्हापूर, ता.3 : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत प्रारूप प्रभाग रचना आज (दि.3 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना प्रभाग नकाशे, व्याप्ती व दिशा दर्शविणारी संपूर्ण माहिती प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रारूप प्रभाग रचनेची प्रसिद्धी खालील ठिकाणी करण्यात येणार आहे :
1. स्थायी समिती हॉल, मुख्य इमारत
2. प्रभाग समिती कार्यालय क्र.1, गांधी मैदान
3. प्रभाग समिती कार्यालय क्र.2, शिवाजी मार्केट
4. प्रभाग समिती कार्यालय क्र.3, राजारामपुरी
5. प्रभाग समिती कार्यालय क्र.4, कावळा नाका
तसेच, कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील ही माहिती नागरिकांना पाहता येणार आहे.
दरम्यान, प्रारूप प्रभाग रचनेबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना दिनांक 3 ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीत दुपारी 3 वाजेपर्यंत स्थायी समिती हॉल, महानगरपालिका, मेन बिल्डिंग येथे स्वीकारल्या जाणार आहेत. हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीकरिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे महानगरपालिकेकडून कळविण्यात येणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रारूप प्रभाग रचना जाहीर
|