बातम्या
कोल्हापूर महापालिका कर्मचाऱ्यांचा २४ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा…
By nisha patil - 4/22/2025 8:34:05 PM
Share This News:
कोल्हापूर महापालिका कर्मचाऱ्यांचा २४ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा…
कोल्हापूर महापालिका कर्मचारी संघटनेचा बेमुदत संपाचा इशारा….
कोल्हापूर महापालिका कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी प्रशासनाला दिलेल्या संपाच्या नोटीसनंतरही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे २४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिलाय.
दीड महिना उलटूनही प्रशासनाकडून एकाही मागणीवर ठोस निर्णय न घेतल्याने संघटनेने बेमुदत संपाची घोषणा केलीय. प्रमुख मागण्यांमध्ये – महापालिकेच्या मुख्य इमारतीत संघटनेस कार्यालयासाठी प्रशस्त जागा देणे, कचरा उठावासाठी पर्याप्त वाहने उपलब्ध करून देणे, सेवानिवृत्त किंवा मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० दिवसांत नोकरी देणे आणि तीन वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे, अश्या मागण्या करण्यात आल्यात.
याबाबतची माहिती संघटनेचे मुख्य समन्वयक संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. संपाच्या पार्श्वभूमीवर कामगार अधिकारी व उपायुक्त पंडित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीस अध्यक्ष दिनकर आवळे, उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, सरचिटणीस अजित तिवले, रवींद्र काळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर महापालिका कर्मचाऱ्यांचा २४ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा…
|