बातम्या
कोल्हापूर महापालिकेचा आदेश : रॉटवेलर, पिट बुल, जर्मन शेफर्ड, डोबर्मन यांना ‘मझल’ लावणे बंधनकारक
By nisha patil - 10/9/2025 1:47:05 PM
Share This News:
कोल्हापूर : शहरामध्ये धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुत्र्यांच्या जाती जसे की रॉटवेलर (Rottweilers), पिट बुल (Pit Bull), जर्मन शेफर्ड (German Shepherd) आणि डोबरमन (Dobermann) यांच्या वाढत्या संख्येवर कोल्हापूर महापालिका आरोग्य विभागाने लक्ष घातले आहे.
महापालिकेने जाहीर आवाहन करताना सांगितले की, या जातींचा स्वभाव आक्रमक व हिंस्र असल्याने हे कुत्रे रस्त्यावर फिरवले असता नागरिकांच्या जीवाला धोका संभवतो. त्यामुळे अशा जातींचे कुत्रे फिरवताना त्यांना चेन/बेल्ट बांधणे आणि तोंडाला ‘मझल’ (Muzzle) लावणे बंधनकारक आहे.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी या नियमांचे पालन केल्यास इतरांना त्रास होणार नाही व कुत्र्यांमुळे अपघात किंवा हल्ल्याच्या घटना टळतील. या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने सर्वांना केले आहे.
कोल्हापूर महापालिकेचा आदेश : रॉटवेलर, पिट बुल, जर्मन शेफर्ड, डोबर्मन यांना ‘मझल’ लावणे बंधनकारक
|