विशेष बातम्या

कोल्हापूर महानगरपालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प सादर : पार्किंग, रस्ते विकास, पर्यावरण व क्रीडा क्षेत्रावर भर

Kolhapur Municipal Corporation presents budget for 2025 26


By nisha patil - 8/11/2025 5:11:55 PM
Share This News:



कोल्हापूर महानगरपालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प सादर : पार्किंग, रस्ते विकास, पर्यावरण व क्रीडा क्षेत्रावर भर

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेचा 2025-26 आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून या बजेटमध्ये शहराच्या पायाभूत सुविधा, वाहतूक सुसूत्रीकरण, पर्यावरण संवर्धन आणि क्रीडा विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.

 पार्किंग सुविधा :
शहरातील वाढत्या वाहनतळ समस्येवर उपाय म्हणून सारस्वती टॉकीज येथे मल्टी-लेवल कार पार्किंग, तसेच गोकुळ हॉटेल परिसरात मल्टी-लेवल मेकॅनिकल पार्किंग सुविधा उभारली जाणार आहे. या योजनेसाठी 4.5 कोटी रुपये तर कवळा नाका येथे लक्झरी बस पार्किंग तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी साइनबोर्ड, दिशादर्शक बोर्ड आणि पार्किंग स्लॉट मार्किंगसाठी कोटी रुपये निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

 रस्ते विकास :
शहरातील रस्त्यांचे बांधकाम व दुरुस्तीवर 20.8 कोटी रुपये खर्च होणार असून इंटीग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत 50 किलोमीटर गॅप भरण्यासाठी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

🌳 पर्यावरण उपक्रम :
पर्यावरण संवर्धनासाठी 1.7 कोटी रुपयांचे डस्ट फिल्टरेशन युनिट्स बसविण्यात येणार आहेत. तसेच बांधकाम आणि विध्वंस कचऱ्याच्या व्यवस्थेसाठी प्लांट उभारण्यात येईल.
शहरात घनदाट वनसृष्टीसाठी 3.6 कोटी रुपये, उद्यान देखभालीसाठी 50 लाख रुपये, नैसर्गिक ग्रंथालयांसाठी 20 लाख रुपये, तर वारसा संवर्धन आणि विजेची व्यवस्था यासाठी 60 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

क्रीडा विकास :
शाहू स्टेडियमजवळ 50 लाख रुपयांचा फूटबॉल स्ट्रीट प्रकल्प, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धांचे आयोजन, तसेच अंबाई टँक स्विमिंग पूलच्या दुरुस्तीसाठी 30 लाख रुपये निधी तरतूद करण्यात आली आहे.

या बजेटमधून शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक सुलभीकरण, पर्यावरण संवर्धन आणि क्रीडा क्षेत्रात नवे बदल अपेक्षित असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.


कोल्हापूर महानगरपालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प सादर : पार्किंग, रस्ते विकास, पर्यावरण व क्रीडा क्षेत्रावर भर
Total Views: 78