विशेष बातम्या

कोल्हापूर महानगरपालिका: २०० कामगारांचा गैरवर्तनाचा खुलासा; मूळ पदावर नियुक्तीची मागणी

Kolhapur Municipal Corporation1


By nisha patil - 8/10/2025 5:14:20 PM
Share This News:



कोल्हापूर महानगरपालिका: २०० कामगारांचा गैरवर्तनाचा खुलासा; मूळ पदावर नियुक्तीची मागणी

कोल्हापूर – महानगरपालिकेतील २०० ते २५० कामगारांच्या गैरवर्तनाची गंभीर बाब समोर आली आहे. माजी उपमहापौर भुपाल महिपती शेटे यांनी प्रशासक मंजुलक्ष्मी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काही कामगार मूळ पदावर काम न करता विभागीय कार्यालयांमध्ये क्लार्क म्हणून बसून अधिकाऱ्यांकडून ठरवलेली टक्केवारी वसूल करतात.

शेटे यांच्या तक्रारीत असेही सांगण्यात आले आहे की, काही पुरुष कामगार अधिकारी व रिटायर्ड अधिकाऱ्यांच्या घरातील प्रायव्हेट कामे करतात; जसे की व्यायामानंतर मसाज करणे, घरातील सफाई करणे, गाड्या धुणे. तसेच काही महिला कामगार अधिकारी यांच्या घरातील धुण्याभांड्याचे काम, फरशी पुसणे इत्यादी करत आहेत.

भुपाल शेटे यांनी मागणी केली आहे की, हे कामगार बुध्द गार्डन येथे बोलवून ओळख पिरीड घेण्यात यावे आणि त्यांना मूळ पदावर कामगार म्हणून नेमणूक देण्यात यावी. तसेच त्यांनी घेतलेल्या बेकायदेशीर पगाराची वसुली केली जावी.

यात म्हटले आहे की, मूळ पदावर कामगार येताच डांबरी, पवडी, गार्डन, पाणीपुरवठा, अतिक्रमण विभाग तसेच सर्व दवाखाने पूर्ण क्षमतेने काम करू शकतील. तसेच कामगार जर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची सूचना आहे.

भुपाल महिपती शेटे यांनी ही माहिती प्रमुख सचिव, सामान्य प्रशासन विभाग, विभागीय आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे पाठवली आहे.

 


कोल्हापूर महानगरपालिका: २०० कामगारांचा गैरवर्तनाचा खुलासा; मूळ पदावर नियुक्तीची मागणी
Total Views: 43