राजकीय

कोल्हापूर महापालिका निवडणूक २०२६: उद्या नामनिर्देशनपत्रे भरण्यास सुरूवात, राजकीय वातावरण तापणार

Kolhapur Municipal Election 2026 Filing of nomination papers begins tomorrow political atmosphere will heat up


By nisha patil - 12/22/2025 5:17:41 PM
Share This News:



कोल्हापूर महापालिका निवडणूक २०२६: उद्या नामनिर्देशनपत्रे भरण्यास सुरूवात, राजकीय वातावरण तापणार

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे भरण्याची प्रक्रिया उद्या, मंगळवारपासून सुरु होत आहे. निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे आणि त्यामुळे राजकीय वातावरण सध्या पहिल्यांदाच इतक्या आधीच तापलं असल्याचे दिसून येत आहे.

आता नामनिर्देशनपत्रे भरण्यापूर्वीच अनेक उमेदवारांनी घरघर जाऊन मतदारांशी संवाद साधला आहे. पदयात्रा, पोस्टर, पत्रके वाटणे आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या संघांमार्फत प्रचाराचे काम जोरात सुरु आहे. यामध्ये महिला आणि युवकांचा सहभागही वाढलेला आहे.

नागरिकांनी आपल्या प्रभागातील उमेदवारांची माहिती वेळेत जाणून घेणे आवश्यक आहे, कारण नामनिर्देशन पत्रे भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. निवडणूक कार्यालये आणि कर्मचारी अंतिम तयारीवर लक्ष केंद्रीत करत आहेत, तर आचारसंहिता अंमलबजावणीसाठीही विविध पथके सक्रिय झाले आहेत.

या निवडणुकीत उमेदवारांची संख्या आणि विचारधारा मतदारांसमोर शेवटच्या क्षणीही स्पष्ट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्थानिक राजकारणात निर्णयासाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरेल.


कोल्हापूर महापालिका निवडणूक २०२६: उद्या नामनिर्देशनपत्रे भरण्यास सुरूवात, राजकीय वातावरण तापणार
Total Views: 66