बातम्या
नगररचना विभागाच्या मनमानीवर कोल्हापूर NEXT चे आवाज
By nisha patil - 12/9/2025 3:07:26 PM
Share This News:
नगररचना विभागाच्या मनमानीवर कोल्हापूर NEXT चे आवाज
सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे नागरिकांच्या वतीने निवेदन
कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार आणि मनमानी थांबवण्यासाठी कोल्हापूर NEXT तर्फे सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांना निवेदन देण्यात आले.
सामान्य नागरिकांच्या छोट्या कामात अडथळे आणत असताना, मोठ्या विकासकामांना तातडीने मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तक्रारी असूनही बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई होत नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
या वेळी चंद्रकांत चव्हाण, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, विजयसिंह खाडे पाटील, प्रदीप उलपे, यशवंत माने, प्रभाकर कुलकर्णी, अभिजीत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
नगररचना विभागाच्या मनमानीवर कोल्हापूर NEXT चे आवाज
|