विशेष बातम्या
पुणे-नागपूर आणि कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसला ४ जनरल डबे वाढणार; ५ सप्टेंबरपासून प्रवाशांना मोठा दिलासा
By nisha patil - 8/15/2025 5:51:20 PM
Share This News:
पुणे-नागपूर आणि कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसला ४ जनरल डबे वाढणार; ५ सप्टेंबरपासून प्रवाशांना मोठा दिलासा
पुणे विभागातून धावणाऱ्या पुणे-नागपूर आणि कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस गाड्यांना प्रवाशांची संख्या वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार येत्या ५ सप्टेंबर २०२५ पासून या दोन्ही गाड्यांना प्रत्येकी चार जनरल डबे वाढविण्यात येणार आहेत.
पुण्यातून विदर्भात जाणारी दैनंदिन प्रवासी संख्या लक्षणीय असून, या मार्गावरील रेल्वेसेवा तुलनेने कमी आहे. त्यामुळे बुकिंग फुल्ल झाल्यानंतर प्रवाशांना खासगी बसमधून प्रवास करावा लागत होता. पुणे-नागपूर दरम्यान जनरल तिकीट १६० रुपये, तर स्लीपर तिकीट ३८० रुपये इतके असते. परंतु खासगी ट्रॅव्हल्सने हा प्रवास दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत महाग होतो.
जनरल डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी बराच काळ प्रलंबित होती. आता ती पूर्णत्वास आल्याने हजारो प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सोयीस्कर प्रवासाची संधी मिळणार आहे.
पुणे-नागपूर आणि कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसला ४ जनरल डबे वाढणार; ५ सप्टेंबरपासून प्रवाशांना मोठा दिलासा
|