ताज्या बातम्या
बेकायदेशीर वृक्षतोडीवर कोल्हापूर नेक्स्टचा संताप..
By nisha patil - 10/10/2025 12:12:00 PM
Share This News:
कोल्हापुरातील उभ्या मारुती चौकाजवळील ब्रम्हेश्वर बाग परिसरात महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी तीन झाडांची बेकायदेशीर तोड केल्याचा आरोप कोल्हापूर नेक्स्ट संघटनेने केला आहे.
या घटनेबाबत जबाबदार कर्मचाऱ्यांवर एका आठवड्यात कारवाई न झाल्यास महानगरपालिकेविरोधात फौजदारी दाखल करू, असा इशारा संघटनेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना दिला.
संघटनेने संबंधित मुकादमाला निलंबित करून चौकशी करण्याची आणि एकाच ठेकेदाराऐवजी अनेक ठेकेदार नेमण्याची मागणी केली आहे. अतिरिक्त आयुक्तांनी तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले.
बेकायदेशीर वृक्षतोडीवर कोल्हापूर नेक्स्टचा संताप..
|