बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये कोल्हापूर शाही दसरा महोत्सव साजरा

Kolhapur Royal Dussehra Festival


By nisha patil - 9/30/2025 12:26:46 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजमध्ये कोल्हापूर शाही दसरा महोत्सव साजरा

 कोल्हापूर दि . 30 :  येथील विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर व मा. शिक्षण सहसंचालक, उच्च शिक्षण , कोल्हापूर यांच्या आदेशानुसार कोल्हापूर शाही दसरा महोत्सव 2025 अंतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.  

या स्पर्धेत विद्यार्थी, विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.  या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. एकनाथ आळवेकर व प्रा.सतीश उपळावीकर  यांनी काम पाहिले.  स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा प्रमुख प्रा.अविनाश गायकवाड, डॉ.सौ. अस्मिता तपासे यांनी पार पाडले.

 


विवेकानंद कॉलेजमध्ये कोल्हापूर शाही दसरा महोत्सव साजरा
Total Views: 63