विशेष बातम्या
कोल्हापूर: महिला सुधारगृहातील सहा नृत्यांगनांचा आत्महत्येचा प्रयत्न, ताबडतोब उपचार सुरू
By nisha patil - 10/17/2025 4:05:04 PM
Share This News:
कोल्हापूर: महिला सुधारगृहातील सहा नृत्यांगनांचा आत्महत्येचा प्रयत्न, ताबडतोब उपचार सुरू
कोल्हापूर – करवीर तालुक्यातील कात्यायनी परिसरात देहविक्री संशयित सहा नृत्यांगनांनी महिला सुधारगृहात हाताच्या नसा कापून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलांना तत्काळ CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
माहिती अशी की, या महिलांवर अश्लील नृत्य आणि वेश्याव्यवसायाच्या कारवाईनंतर कोर्टाने त्यांना सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्या ठिकाणी होत्या. जामीन मिळत नसल्यामुळे नैराश्यातून त्यांनी हा धाडसी पाऊल उचलल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
सीपीआर रुग्णालयातील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व महिला सुरक्षित आहेत आणि त्यांच्या प्रकृतीवर सखोल उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर: महिला सुधारगृहातील सहा नृत्यांगनांचा आत्महत्येचा प्रयत्न, ताबडतोब उपचार सुरू
|