शैक्षणिक
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आयपीआर कक्षाची स्थापना
By nisha patil - 9/5/2025 12:07:35 AM
Share This News:
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आयपीआर कक्षाची स्थापना
मायक्रेव्ह कन्सल्टंसीसोबत सामंजस्य करार
तळसंदे : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने मायक्रेव्ह कन्सल्टंसी अँड सर्व्हिसेससोबत सामंजस्य करार करत बौद्धिक संपत्ती अधिकार (IPR) कक्षाची स्थापना केली. संशोधन व नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कक्ष कार्यरत राहणार आहे.
यावेळी कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी आयपीआर कक्षामुळे संशोधनातील नवकल्पनांना दिशा मिळेल, असे सांगितले. कुलसचिव डॉ. जे. ए. खोत यांनी आयपीआरचे व्यावसायिक मूल्य स्पष्ट केले. मायक्रेव्ह कन्सल्टंसीचे उपाध्यक्ष किशोर शेंडगे यांनी पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट्स यांची सविस्तर माहिती दिली.
उपक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. शिवानंद शिर्कोले, प्रदीप पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. या प्रसंगी वित्त अधिकारी सुजीत सरनाईक, डॉ. मुरली भूपती, डॉ. संग्राम पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज व पृथ्वीराज पाटील, संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आयपीआर कक्षाची स्थापना
|