बातम्या
कोल्हापूर: दुचाकी व तीन आसनी रिक्षा विक्रेत्यांकडून ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क वसूल; आंदोलनाचा इशारा
By nisha patil - 8/10/2025 5:19:43 PM
Share This News:
कोल्हापूर: दुचाकी व तीन आसनी रिक्षा विक्रेत्यांकडून ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क वसूल; आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर – शहर व जिल्हयामध्ये दुचाकी वाहने व तीन आसनी रिक्षा विक्रेत्यांकडून ग्राहकांकडून अनधिकृत अतिरिक्त शुल्क वसूल केल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे.
शहरातील विक्रेत्यांनी Pre-delivery Inspection (PDI) चार्जेस, Handling Charges, Lodgestick Charges या नावाखाली प्रत्येक दुचाकी वाहनामागे १५०० ते २००० रुपये अतिरिक्त वसूल केल्याचे समोर आले आहे. तसेच, तीन आसनी रिक्षा विक्रीत देखील वाहनांच्या विमा किंमतीपेक्षा ३००० ते ५००० रुपये जास्त वसूल केले जात असल्याचे आढळले आहे.
विशेष म्हणजे, फक्त दसऱ्याच्या सणात शहर व जिल्हयामध्ये अंदाजे ५००० दुचाकी वाहने विकली गेली असून, सरासरी १५०० रुपये अतिरिक्त वसूल केल्यास एकूण ७७ लाख रूपये ग्राहकांकडून घेतले गेले असल्याचा अंदाज आहे.
सुभाष शेटे, अविनाश दिंडे, श्रीकांत पाटील, जाफर मुजावर, नरेंद्र पाटील यासह कोल्हापूर शहरातील सर्व रिक्षा चालक मालक संघटना या प्रकरणाची दखल घेत असून, विक्रेत्यांकडून वसूल केलेल्या अतिरिक्त शुल्काची यादी तयार करून ८ दिवसांच्या आत ग्राहकांना परत करण्याची मागणी केली आहे.
संघटनेतून चेतावणी देण्यात आली आहे की, जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर दिवाळीच्या पूर्वसंध्येला तीव्र आंदोलन केले जाईल.
कोल्हापूर प्रशासनाने याबाबत तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी संबंधित संघटनेकडून करण्यात आली आहे.
कोल्हापूर: दुचाकी व तीन आसनी रिक्षा विक्रेत्यांकडून ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क वसूल; आंदोलनाचा इशारा
|