शैक्षणिक
कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग राज्यात प्रथम...
By nisha patil - 10/10/2025 12:27:37 PM
Share This News:
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, आता देशात पहिलं स्थान मिळवण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपस्थिती लावत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
या पार्श्वभूमीवर ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार 2024-25 व 2025-26’ तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात आमदार अशोकराव माने, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात ई-जीपीएफ संगणक प्रणालीचे अनावरण करण्यात आले असून, यामुळे शिक्षकांना जीपीएफ स्लिप आता मोबाइलवर सहज मिळणार आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरले.
कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग राज्यात प्रथम...
|