बातम्या
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; निवडणुकीत चुरस वाढणार
By nisha patil - 12/9/2025 3:16:47 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; निवडणुकीत चुरस वाढणार
येत्या दोन महिन्यांत होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याचे ग्रामविकास विभागाने ९ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या अधिसूचनेत स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे आता मातब्बर नेत्यांच्या पत्नी व सुना निवडणूक रिंगणात उतरणार, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. दिवाळीनंतर होणाऱ्या या निवडणुकांसाठी प्रभाग रचना निश्चित झाली असून आरक्षणाचा तिढा सुटला आहे. प्रभाग रचनेवरून न्यायालयात याचिका दाखल असली तरी अध्यक्षपदाचे आरक्षण स्पष्ट झाल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण महिलांसाठी अध्यक्षपद राखीव झाल्याने निवडणुकीतील रंगत आणि चुरस आणखी वाढणार आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; निवडणुकीत चुरस वाढणार
|