राजकीय

कोल्हापूर शहरातील रस्ते दर्जेदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

Kolhapur city will not rest until roads are improved


By nisha patil - 3/11/2025 10:59:59 AM
Share This News:



कोल्हापूर:- महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार मा. श्री राजेश क्षीरसागर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आज कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ परिसर कैलास गडची स्वारी अंतर्गत विलास पाटील घर ते गजानन पोतदार घर रस्ता डांबरी करणे कामाचा शुभारंभ भागातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

सदर रस्ता डांबरीकरण्याची गेली अनेक दिवसाची नागरिकांची मागणी पूर्ण झाली असून आमदार क्षीरसागर यांच्या निधीतून ₹ १० लाखाचा निधी सदर रस्त्यासाठी देण्यात आला आहे.

आज या कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले आणि सुस्थितीत असावे तसेच नागरिकांना कसलाही त्रास होऊ नये, यासाठी वारंवार मनापा प्रशासना सोबत बैठका घेऊन सूचना दिलेल्या आहेत, तसेच मी आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर दोघेही कामावर लक्ष ठेवून आहोत. जागतिक बँक आणि मित्रा संस्थेच्या वतीने रस्त्यासाठी आणखीन निधी मंजूर करून घेऊ पण रस्ते सुस्थितीत आणि दर्जेदारचं झाले पाहिजेत अशा सक्त सूचना मनपा तसेच कंत्राटदार यांना दिल्याचे त्यांनी संगितले.

शहरातील रस्ते दर्जेदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रणजीत मंडलिक, महिला आघाडी शहरप्रमुख सौ.पवित्रा रांगणेकर, उपशहरप्रमुख सचिन पाटील, गणेश रांगणेकर, युवासेना सरचिटणीस कुणाल शिंदे, प्रॅक्टीस फुटबॉल क्लबचे उपाध्यक्ष संतोष महाडिक, श्रीकांत मंडलिक, राहुल चव्हाण, अजित सासने, किरण अतिग्रे, रणजीत सासणे, संजय माने, गोपी मंडलिक, संदीप पवार, रुपेश रोडे, आशिष पोवार, सागर माळी, संकेत गवळी, आर्यनील जाधव, निलेश पोरे, अवधूत माळी, श्रीधर पाटील, शुभम मस्कर, तुषार मगर, प्रवीण माळी आदी भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोल्हापूर शहरातील रस्ते दर्जेदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर
Total Views: 35