बातम्या

कोल्हापूर जिल्हा राज्यात शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल; पहिला क्रमांक पटकावला!"

Kolhapur district tops the state in educational quality

By nisha patil - 1/7/2025 4:56:48 PM
Share This News:

कोल्हापूर जिल्हा राज्यात शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल; पहिला क्रमांक पटकावला!"

2023-24 च्या शैक्षणिक कार्यक्षमता निर्देशांकात कोल्हापूरने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून 72 सूचकांवर आधारित 600 गुणांच्या निकषानुसार हे मूल्यांकन केलं जातं. कोल्हापूरने 345 गुण मिळवत ही घवघवीत कामगिरी केली.

चार वर्षांपूर्वी 28व्या स्थानी असलेला जिल्हा आज शिखरावर पोहोचला आहे. या यशानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, डॉ. एकनाथ आंबोकर आणि डॉ. राजेंद्र भोई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षणातील गुणवत्ता आणि प्रयत्नांचे हे मोठे यश आहे.

कोल्हापूर जिल्हा राज्यात शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल; पहिला क्रमांक पटकावला!"
Total Views: 134