बातम्या

कोल्हापुरला लागले फुटबॉल स्पर्धांचे वेध, यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याक़डून विविध संघांना झाले फुटबॉल किटचे वाटप

Kolhapur gets excited about football competitions


By nisha patil - 11/13/2025 3:07:32 PM
Share This News:



कोल्हापुरला लागले फुटबॉल स्पर्धांचे वेध, यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याक़डून विविध संघांना झाले फुटबॉल किटचे वाटप

कोल्हापूरला फुटबॉल पंढरी म्हंटले जाते. फुटबॉलवेड्या खेळाडूंना आता फुटबॉल हंगामाचे वेध लागले आहेत. अशावेळी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापुरातील काही तालीम संघाच्या खेळाडूंना फुटबॉल किटचे वाटप केले.

कोल्हापूरच्या गल्ली-बोळात फुटबॉल फिवर दिसून येतो. आता कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाचे वेध लागले आहेत. त्यामुळे खेळाडूंकडून सराव सुरु आहे. अशावेळी मंगळवारी सकाळी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी दिलबहार तालीम मंडळ आणि पाटाकडील तालीम अ आणि ब संघातील खेळाडूंशी संवाद साधला. या संघातील २० खेळाडूंना फुटबॉलच्या किटचे वाटप करण्यात आले. पाटाकडील तालीम मंडळाचे रुपेश सुर्वे, सैफ हकीम, दिलबहार तालीम मंडळाचे धनाजी सूर्यवंशी आणि खेळाडू यावेळी उपस्थित होते. 

दरम्यान क्रीडा संकुलवर फुटबॉलचा सराव करणार्‍या प्रॅक्टिस क्लबच्या खेळाडूंची, कृष्णराज महाडिक यांनी भेट घेतली. फुटबॉल क्लबचे अध्यक्ष निखिल सावंत, प्रशिक्षक तन्मय पॉल, बाबू पाटील, खेळाडू राजू वायचळ, रोहित आळवेकर, रोहन खिरुगडे, केशव पंडे, श्रीधर पाटील, दीपक भोसले यांच्याकडे फुटबॉलचे कीट सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर जाऊन, कृष्णराज महाडिक यांनी खंडोबा मंडळाचे प्रशिक्षक योगेश वणिरे, खेळाडू अभिजीत चव्हाण, त्र्यंबक पवार, संकेत सूर्यवंशी यांच्याकडं कीट सुपूर्द केली. लवकरच कोल्हापुरातील वरिष्ठ संघातील खेळाडूंना कीटचे वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  


कोल्हापुरला लागले फुटबॉल स्पर्धांचे वेध, यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याक़डून विविध संघांना झाले फुटबॉल किटचे वाटप
Total Views: 27