बातम्या

कोल्हापूर हायकर्सकडून शिवराज्याभिषेकासाठी पवित्र जल संकलन

Kolhapur hikers collect holy water for Shivas coronation


By nisha patil - 5/29/2025 9:22:06 PM
Share This News:



कोल्हापूर हायकर्सकडून शिवराज्याभिषेकासाठी पवित्र जल संकलन
 

रायगड | २९ मे २०२५ आखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने होणाऱ्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त कोल्हापूर हायकर्सच्या रणरागिनींनी महाराष्ट्र व हिमालयातील पवित्र स्थळांहून जल संकलन मोहीम राबवली. यामध्ये ताराराणी महाराजांच्या ३५०व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून पन्हाळा, रायगड, अजिंक्यतारा, विशाळगड, जिंजी, सिंहगड, संगममावळी तसेच हिमालयातील काली नदीच्या उगमस्थानावरून जल आणण्यात आले.

हिमालयातील उत्तराखंड राज्यातील काली नदीच्या उगमस्थानी जाऊन कोल्हापूर हायकर्सच्या श्रावणी पाटील, आरती संकपाळ, स्नेहा जाधव, गौतमी भाले, तृप्ती पवार, श्रेया शिंदे, सोनाली ससे, देविकाराणी पाटील, चंद्रलेखा सावंत या महिला सदस्यांनी जल संकलन केले. त्यांना जयाजी मोहिते, सागर पाटील, विजय ससे, ओम कोगनोळे, रणसिंग जाधव, अविनाश भाले, इंद्रजीत मोरे यांनी साथ दिली.

या पवित्र जलाने रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार असून, हा जलप्रवाह केवळ परंपरेचा नव्हे तर स्वराज्य, श्रद्धा आणि शौर्याचा प्रतीक ठरणार आहे. पत्रकार परिषदेस समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर, कार्याध्यक्ष सुखदेव गिरी, हेमंत साळुंखे आदी उपस्थित होते.


कोल्हापूर हायकर्सकडून शिवराज्याभिषेकासाठी पवित्र जल संकलन
Total Views: 64