खेळ
राष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा सन्मान! सिद्धी जाधव हिची पंच म्हणून निवड
By nisha patil - 2/8/2025 4:22:23 PM
Share This News:
राष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा सन्मान! सिद्धी जाधव हिची पंच म्हणून निवड
कोल्हापूर : 15 वी अखिल भारतीय ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धा दिनांक 1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2025 या कालावधीत आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे पार पडणार आहे. या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या कु. सिद्धी संदीप जाधव हिची पंच म्हणून निवड झाल्याने कोल्हापूरचा झेंडा पुन्हा एकदा उंचावला आहे.
सिद्धी जाधव हिने यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमध्ये यशस्वी पंचगिरी करत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या या यशामागे खासदार धैर्यशील माने यांचे वेळोवेळी मिळालेले प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे.
यासोबतच हॉकी इंडियाचे उपाध्यक्ष मनोज भोरे, हॉकी महाराष्ट्रचे अध्यक्ष कृष्णप्रकाश, सचिव मनीष आनंद, आंतरराष्ट्रीय पंच दिग्विजय नाईक, तसेच हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सुरेखा पाटील, सचिव मोहन भांडवले आणि सर्व सदस्यांचे सततचे मार्गदर्शन व पाठबळही तिला लाभले.
सिद्धीच्या या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हॉकी क्षेत्रातील युवक-युवतींना प्रेरणा मिळेल, असे मत क्रीडावर्तुळातून व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा सन्मान! सिद्धी जाधव हिची पंच म्हणून निवड
|