बातम्या
माउंट आबू येथे आंतरराष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्ससाठी कोल्हापूरचे पत्रकार रवाना
By nisha patil - 9/26/2025 4:40:00 PM
Share This News:
माउंट आबू येथे आंतरराष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्ससाठी कोल्हापूरचे पत्रकार रवाना
रेल्वे सदस्य शिवनाथ बियाणी यांच्याकडून शुभेच्छा
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, माउंट आबू येथे दरवर्षी आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्ससाठी कोल्हापूरसह भुदरगड परिसरातील अनुबोध समूहाचे पत्रकार रवाना झाले. या परिषदेत देशभरातील तीन हजारांहून अधिक पत्रकार सहभागी होणार आहेत.
कोल्हापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ साधक रघुनाथ भाई, अनुबोध संपादक मिलिंद प्रधान, आरोग्यमित्र पत्रकार राजेंद्र मकोटे, तुषार भिवटे यांच्यासह स्थानिक पत्रकार उपस्थित होते. मकोटे यांनी कोल्हापूरची आठवण म्हणून आयुर्वेदात महत्त्वाचे मानले जाणारे महाळूंग वृक्षाचे रोप माउंट आबू येथे लावण्यासाठी सुपूर्त केले.
माउंट आबू येथे आंतरराष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्ससाठी कोल्हापूरचे पत्रकार रवाना
|