बातम्या
कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसची व्यापक बैठक
By nisha patil - 6/18/2026 10:51:33 PM
Share This News:
*केंद्रीय गृहमंत्री नामदार अमितजी शहा यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा*
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचे आवाहन*
कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसची व्यापक बैठक*
कोल्हापूर, दि. १८:केंद्रीय गृहमंत्री व केंद्रीय सहकार मंत्री नामदार अमितजी शहा यांच्या कोल्हापूरमधील स्वागतासाठी शनिवारी दि. २० हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात नियोजनासाठी तालुकानिहाय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत श्री. पाटील बोलत होते.
भाषणात श्री. आसुर्लेकर-पाटील पुढे म्हणाले, आपले नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार श्री. शहा यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर शहर, तालुके व गावोगावी सूक्ष्म नियोजन करा.
गाव पातळीवरील अगदी बूथलेवल कार्यकर्ता, अध्यक्ष पदाधिका-यांपासून ते नेत्यांपर्यंत सूक्ष्म नियोजन करा. ग्रामसमन्वयकापासून पदाधिकाऱ्यापर्यंत, पंचायत समिती गणांचे प्रमुख पदाधिकारी व जिल्हा परिषद गटाचे सर्व प्रमुख पदाधिका-यांपासून तालुका कार्यकारिणी, विधानसभा मतदार संघ कार्यकारिणी या सर्वांनी अहोरात्र काम करा. जिल्ह्यात १३ नगरपालिका क्षेत्रातील शहराध्यक्षापासून ते नगराध्यक्ष व नगरसेवक, असे सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
या बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे, नितीन दिंडे, अमरसिंह माने-पाटील, बाबासाहेब देशमुख, अमित गाताडे, आप्पासाहेब धनवडे, शिवाजी देसाई, युवराज पाटील, संभाजी पाटील -भुयेकर, विकास पाटील, शिरीष देसाई, सुरेशराव चौगुले, सागर भावके आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी केले. आभार इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे यांनी मानले.
कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसची व्यापक बैठक
|