बातम्या
डीजेच्या तालावर थिरले कोल्हापूरकर; दुसऱ्या दिवशी रस्त्यावर चपलांचा खच!
By nisha patil - 9/26/2026 3:44:43 PM
Share This News:
डीजेच्या तालावर थिरले कोल्हापूरकर; दुसऱ्या दिवशी रस्त्यावर चपलांचा खच!
कोल्हापूर : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या जल्लोषानंतर दुसऱ्या दिवशी कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर चपलांचा अक्षरशः खच पाहायला मिळाला. काल वेताळ तालीम परिसरासह विविध ठिकाणी डीजे-डॉल्बीच्या तालावर कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
मिरवणुकीतील गर्दी आणि जल्लोषात अनेकांच्या चपला हरवल्या किंवा तुटल्या. त्यामुळे सकाळी रस्त्यांवर चपलांचा मोठा ढिगारा दिसून आला. महापालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने साफसफाई मोहीम राबवत हा परिसर स्वच्छ केला.
दरवर्षी विसर्जनानंतर चपलांचा हा ‘ढिगारा’ वाढताना दिसत असून, कोल्हापूरकरांच्या जल्लोषाची ही एक वेगळीच चर्चा ठरली आहे.
डीजेच्या तालावर थिरले कोल्हापूरकर; दुसऱ्या दिवशी रस्त्यावर चपलांचा खच!
|