बातम्या
काँग्रेसच्या आवाहनाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By nisha patil - 9/27/2025 4:25:27 PM
Share This News:
काँग्रेसच्या आवाहनाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच
कोल्हापूर (दि. २७): आमदार सतेज पाटील यांच्या आवाहनानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मराठवाडा व सोलापूर पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत दिली आहे.
धान्य, कपडे, ब्लॅंकेट्स, शैक्षणिक साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचा ओघ जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सुरू असून हातावरचे पोट असणाऱ्यांनीही खारीचा वाटा उचलला आहे.
माहितीनुसार,
आतापर्यंत १५०० हून अधिक अन्नधान्याचे किट जमा झाले असून, त्यात तांदूळ, गहू, साखर, डाळी, चहा पावडर, मसाले व खाद्यतेलाचा समावेश आहे. तसेच ४ हजार किलो तांदूळ, २ हजार किलो गहू व इतर वस्तूही मिळाल्या आहेत.
ही सर्व मदत येत्या २९ सप्टेंबर रोजी पूरग्रस्त जिल्ह्यांकडे रवाना केली जाणार आहे.
काँग्रेसच्या आवाहनाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
|