बातम्या
कोल्हापूरकरांनो, पाणी जपून वापरा! सोमवारी मोठी पाणीबंदी!
By nisha patil - 11/28/2026 2:14:59 PM
Share This News:
कोल्हापूरकरांनो, पाणी जपून वापरा! सोमवारी मोठी पाणीबंदी!
कोल्हापूरकरांनो, पाणी जपून वापरा! सोमवारी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. चंबुखडी मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व दुरुस्तीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. चंबुखडी टाकीवरून येणाऱ्या २७ इंची मुख्य गुरुत्ववाहिनीवरील व्हॉल्व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी बालिंगा जलउपसा केंद्रावर अवलंबून असलेल्या परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
तर मंगळवार, १ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होणार आहे. याचा फटका ए आणि बी वॉर्डसह लक्षतीर्थ, फुलेवाडी, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, महाद्वार रोड, बिंदू चौक, महालक्ष्मी मंदिर परिसरासह शहरातील अनेक भागांना बसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सोमवारच्या पाणीबंदीसाठी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
कोल्हापूरकरांनो, पाणी जपून वापरा! सोमवारी मोठी पाणीबंदी!
|