बातम्या

कोल्हापूरच्या रंगकर्मींचा पुण्यात दणदणीत विजय; ‘A Useless Genius’ ठरला सर्वोत्तम नाट्यप्रयोग

Kolhapur theatre artists win resounding victory in Pune


By Administrator - 3/26/2026 12:31:37 PM
Share This News:



कोल्हापूरच्या रंगकर्मींचा पुण्यात दणदणीत विजय; ‘A Useless Genius’ ठरला सर्वोत्तम नाट्यप्रयोग

पुणे : पुणे विभागाच्या ७१ व्या कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यस्पर्धेत कोल्हापूरच्या रंगकर्मीांनी आपल्या दमदार सादरीकरणाने ठसा उमटवत सांघिक प्रथम क्रमांक पटकावला. सदाशिव पेठ येथील भरत नाट्य मंदिरात पार पडलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर येथील एकूण १७ संघांनी सहभाग नोंदवला होता.
 

मंगळवारी (२४ मार्च) पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात ज्येष्ठ नाट्यकर्मी भालचंद्र कुबल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पुणे विभागाचे सहाय्यक कल्याणआयुक्त मनोज पाटील, विविध संघांचे प्रतिनिधी, कलाकार आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूरच्या कामगार कल्याण केंद्र, संभाजीनगरच्या संघाने श्रेयस सोनार लिखित आणि पार्थ घोरपडे दिग्दर्शित ‘A Useless Genius’ हे नाटक सादर करत परीक्षकांची मने जिंकली. या नाटकाने एकूण सात वैयक्तिक पारितोषिकांसह सांघिक प्रथम क्रमांक मिळवत स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.
या नाटकाला मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे :
* सर्वोत्कृष्ट नाट्यप्रयोग (प्रथम) – ‘A Useless Genius’
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (प्रथम) – पार्थ घोरपडे
* सर्वोत्कृष्ट अभिनेता (प्रथम) – पार्थ घोरपडे
* सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना (प्रथम) – यश शिंदे
* सर्वोत्कृष्ट नेपथ्य (प्रथम) – कौस्तुभ जंगम
* सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत (द्वितीय) – ऋषिकेश कुलकर्णी
* सर्वोत्कृष्ट अभिनेता (उत्तेजनार्थ) – नागनाथ पाटील
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (उत्तेजनार्थ) – जुई पाटील
या यशामुळे कोल्हापूरच्या रंगभूमीला नवसंजीवनी मिळाली असून, नवोदित कलाकारांच्या प्रतिभेला मोठे व्यासपीठ मिळत असल्याचे चित्र दिसून आले. मेहनत, सर्जनशीलता आणि प्रभावी सादरीकरण यांच्या जोरावर कोल्हापूरच्या संघाने पुण्यात आपला ठसा उमटवत रंगकर्मींचा अभिमान उंचावला आहे.


कोल्हापूरच्या रंगकर्मींचा पुण्यात दणदणीत विजय; ‘A Useless Genius’ ठरला सर्वोत्तम नाट्यप्रयोग
Total Views: 12