बातम्या
✨ “नवरात्राच्या नऊ रंगांत रंगणार कोल्हापूर; भक्ती, उत्साह आणि परंपरेचा संगम
By nisha patil - 9/13/2025 2:09:57 PM
Share This News:
कोल्हापूर शहरात नवरात्रोत्सवाचा माहोल रंगू लागला आहे. अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या या उत्सवासाठी धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक स्तरावर जोरदार तयारी सुरू झाली आहे.
नवरात्रीसाठी लागणारे रंगीबेरंगी ड्रेस, पूजा साहित्य, फुलांच्या माळा, सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. ग्राहकांची गर्दी वाढू लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शहरात उत्तर भारतीय, बंगाली, कर्नाटकी आदी समाज आपापल्या प्रथेनुसार नवरात्र साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी वेगात सुरू आहे.
कुंभारवाड्यांमध्ये दुर्गामाता मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कलाकारांनी रंगकामाला गती दिली असून भाविकांकडून मूर्ती बुकिंगही सुरू झाले आहे.
अंबाबाईसह शहरातील विविध देवी-देवतेच्या मंदिरांमध्ये स्वच्छतेची मोहीम राबवली जात आहे. घराघरातही नवरात्र स्वागतासाठी स्वच्छतेची लगबग सुरू झाली आहे.
तरुणाईमध्ये दांडिया व गरबाची जोरदार तयारी सुरू असून विविध ग्रुप सराव, पोशाख व संगीताच्या निवडीसह सज्ज झाले आहेत. सार्वजनिक मंडळांमध्ये दुर्गा प्रतिष्ठापनेसाठीही उत्साह ओसंडून वाहत आहे.
✨ “नवरात्राच्या नऊ रंगांत रंगणार कोल्हापूर; भक्ती, उत्साह आणि परंपरेचा संगम
|