बातम्या

डब्ल्यूसी अॅम्पिकॉन 2025’ आंतरराष्ट्रीय परिषद कोल्हापुरात उत्साहात संपन्न

Kolhapur5


By nisha patil - 4/30/2025 8:34:09 PM
Share This News:



डब्ल्यूसी अॅम्पिकॉन 2025’ आंतरराष्ट्रीय परिषद कोल्हापुरात उत्साहात संपन्न

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या वैद्यकीय भौतिकशास्त्र विभाग आणि असोसिएशन ऑफ मेडिकल फिजिसिस्ट्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डब्ल्यूसी अॅम्पिकॉन 2025’ ही आंतरराष्ट्रीय परिषद २६-२७ एप्रिल रोजी सयाजी हॉटेलमध्ये उत्साहात पार पडली.

 

या परिषदेत देशभरातून २५० हून अधिक वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला. उद्घाटन पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांच्या हस्ते झाले. परिषदेत किरणोत्सर्ग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्युअल एनर्जी सिटी यांसारख्या विषयांवर सादरीकरण आणि चर्चासत्रे झाली.

 

२७ एप्रिल रोजी कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये टीबीआय आणि टीएमएलआय विषयावर विशेष कार्यशाळाही घेण्यात आली.

परिषदेच्या आयोजनात कुलपती डॉ. संजय डी. पाटील व आमदार सतेज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन

लाभले.


डब्ल्यूसी अॅम्पिकॉन 2025’ आंतरराष्ट्रीय परिषद कोल्हापुरात उत्साहात संपन्न
Total Views: 174