बातम्या

कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यासाठी खासदार महाडिकांचा पुढाकार

Kolhapuri chapal


By nisha patil - 6/30/2025 7:11:49 PM
Share This News:



 

प्राडा फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलचा सन्मान –

खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्राकडे मान्यता आणि प्रचारासाठी मागणी

इटलीतील प्राडा कंपनीने फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यांनी कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली.

प्राडाने चप्पलचे डिझाईन कोल्हापुरी असल्याचे मान्य केल्याने, महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. महाडिक यांनी प्राडाकडून ‘कोल्हापुरी लेदर फुटवेअर’ असा स्पष्ट उल्लेख करण्याची मागणी केली असून, गरज पडल्यास कोल्हापूरमधील कारागीर मोठ्या प्रमाणावर उत्पादन देण्यास तयार असल्याचेही सांगितले.


कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यासाठी खासदार महाडिकांचा पुढाकार
Total Views: 71