विशेष बातम्या

कोल्हापुरी चप्पल थेट इटलीत; कागलच्या कारागिराची कलाकृती जगाच्या व्यासपीठावर

Kolhapuri slippers directly to Italy

By nisha patil - 12/15/2025 3:59:22 PM
Share This News:

कोल्हापुरी चप्पल थेट इटलीत; कागलच्या कारागिराची कलाकृती जगाच्या व्यासपीठावर

कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बानगे गावचे कारागीर राजेंद्र गोविंदा शिंदे यांनी तयार केलेली एकमेव, अत्यंत सुबक आणि नक्षीदार कोल्हापुरी चप्पल थेट इटलीला जाणार आहे. २० दिवसांच्या मेहनतीत साकारलेल्या या चपलांचे दोन्ही पायांचे वजन अचूक २११ ग्रॅम असून १ एमएमच्या २० वेण्या, गोट, मोती व टिकाऊ नक्षीकाम ही वैशिष्ट्ये आहेत.

दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ही चप्पल सर्वोत्कृष्ट ठरली असून तिची किंमत ५१ हजार रुपये आहे. इटालियन ग्राहकाच्या खास मागणीवरून तयार झालेली ही चप्पल विमान प्रवास करून इटलीला जाणार असून, पुढील टप्प्यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्याचा मानस राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापुरी चप्पल थेट इटलीत; कागलच्या कारागिराची कलाकृती जगाच्या व्यासपीठावर
Total Views: 44