बातम्या

कोल्हापूरकरांनो, KMT प्रवास महागणार! तिकिटात थेट ३ रुपयांची वाढ?

Kolhapurians KMT travel will become more expensive


By nisha patil - 11/19/2026 3:16:52 PM
Share This News:



कोल्हापूरकरांनो, KMT प्रवास महागणार! तिकिटात थेट ३ रुपयांची वाढ?

 कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरात केएमटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच जादा पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. केएमटीच्या तिकीट दरात २ ते ३ रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थी पासमध्येही ५० रुपयांची वाढ सुचवण्यात आली आहे. हा प्रस्ताव लवकरच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

कोरोना महामारी आणि त्यानंतर झालेल्या डिझेल दरवाढीमुळे केएमटीने यापूर्वी पासच्या दरात वाढ केली होती. मात्र, बसची संख्या कमी होत गेल्याने आणि प्रवाशांना अपेक्षित सेवा मिळत नसल्याने तिकीट दरात वाढ करण्यात आली नव्हती. आता पीएम ई-बस योजनेअंतर्गत कोल्हापूरला १०० ई-बस मंजूर झाल्या असून, त्या टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होत आहेत. सध्या जवळपास निम्म्या ई-बस रस्त्यावर धावत आहेत. त्यासोबत जुन्या डिझेल बसही सुरू आहेत.

नवीन ई-बसच्या संचालनासाठी प्रत्येक किलोमीटरमागे खर्च करावा लागत आहे. हा खर्च आणि उत्पन्नातील तफावत भरून काढण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार असून, राज्य सरकारकडूनही आर्थिक मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आर्थिक ताण कमी करण्यासाठी तिकीट दरवाढ आवश्यक असल्याचे केएमटी प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे दररोज केएमटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. मात्र, ही दरवाढ अद्याप अंतिम झालेली नाही. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरच नवीन दर लागू होणार आहेत.


कोल्हापूरकरांनो, KMT प्रवास महागणार! तिकिटात थेट ३ रुपयांची वाढ?
Total Views: 12