बातम्या

कोल्हापूरकरांनो, नळ कनेक्शन बदला! १५ डिसेंबरनंतर जुनी पाईपलाईन बंद

Kolhapurians change your water connection


By nisha patil - 11/21/2026 2:46:37 PM
Share This News:



कोल्हापूरकरांनो, नळ कनेक्शन बदला! १५ डिसेंबरनंतर जुनी पाईपलाईन बंद

कोल्हापूर शहरातील अमृत योजनेअंतर्गत नवीन पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यात आलेल्या भागांतील नागरिकांसाठी महापालिकेने महत्त्वाचे आवाहन केले आहे. जुन्या पाईपलाईनवरील नळ कनेक्शन आता नवीन पाईपलाईनवर स्थलांतरित करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत कोल्हापूर शहरात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. अनेक भागांत नवीन पाईपलाईन टाकण्यात आल्या असून काही ठिकाणी नवीन आणि जुन्या अशा दोन्ही पाईपलाईनमधून पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना अपेक्षित दाबाने पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत.

ही समस्या दूर करण्यासाठी नवीन पाईपलाईन कार्यान्वित झालेल्या भागांतील जुन्या आणि खराब पाईपलाईन बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे जुन्या पाईपलाईनवरील नळ कनेक्शनधारकांनी दिलेल्या मुदतीत स्वखर्चाने आपले कनेक्शन नवीन पाईपलाईनवर स्थलांतरित करून घ्यावे. विशेष म्हणजे, १५ डिसेंबरनंतर जुनी पाईपलाईन बंद करण्यात येणार असून, कनेक्शन स्थलांतरित न केलेल्या नागरिकांचा पाणीपुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.


कोल्हापूरकरांनो, नळ कनेक्शन बदला! १५ डिसेंबरनंतर जुनी पाईपलाईन बंद
Total Views: 24