खेळ
कोल्हापूरचा अनिकेत जाधव केरळ सुपर लीगसाठी करारबद्ध
By nisha patil - 9/23/2025 12:19:25 PM
Share This News:
कोल्हापूर :- कोल्हापूरचा युवा आणि प्रतिभावान फुटबॉलपटू अनिकेत जाधव केरळ सुपर लीगच्या दुसऱ्या हंगामात कॅलिकट एफसी कडून खेळणार आहे. सहा महिन्यांसाठी झालेल्या या करारात अनिकेतला रेकॉर्डब्रेक मानधन मिळाले असून, त्यामुळे तो लीगचा नवा ‘स्टार प्लेअर’ ठरला आहे.
या हंगामात रॉय कृष्णा, प्रशांत रे मोहन, आसिफ खान, लॅनी रॉड्रिग्स आणि सुमित राठी यांसारखे आयएसएलमध्ये झळकलेले अनुभवी खेळाडूही सहभागी होत आहेत. त्यामुळे अनिकेतला उच्च दर्जाच्या स्पर्धेत चमक दाखवण्याची संधी मिळणार आहे.
अनिकेतच्या या यशात ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे सदस्य मालोजीराजे, ‘विफा’च्या मधुरिमाराजे आणि कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) च्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
कोल्हापूरचा अनिकेत जाधव केरळ सुपर लीगसाठी करारबद्ध
|