बातम्या
कोल्हापूरच्या नगारखान्याला १९१ वर्षांचा गौरव...
By nisha patil - 2/10/2025 3:14:08 PM
Share This News:
कोल्हापूरच्या नगारखान्याला १९१ वर्षांचा गौरव...
शौर्यगाथा कार्यक्रमात रंगली सांस्कृतिक शोभा
कोल्हापूरच्या ऐतिहासिक नगारखान्यास १९१ वर्ष पूर्ण झाल्याचे शाही दसरा महोत्सवांतर्गत ‘कोल्हापूरची शौर्यगाथा’ कार्यक्रमात साजरे करण्यात आले. भवानी मंडप कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगलतोरण शाहू महाराज छत्रपती आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बांधले.
छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या कर्तृत्वावर आधारित गीते, नृत्ये आणि सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. युवक सॅक्सोफोन वादक अरहान मिठारीच्या मधुर सादरीकरणाने कार्यक्रम रंगला. कार्यक्रमात मान्यवरांचा सहभाग असून, जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
कोल्हापूरच्या नगारखान्याला १९१ वर्षांचा गौरव...
|